केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकलं आहे. गेल्या सहा वर्षात या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगानं अशा इतर ३३४ पक्षांवर कारवाई केली होती.
गेल्या तीन आर्थिक वर्षांत वार्षिक लेखापरीक्षणाचे अहवाल सादर न केल्यामुळे ३५९ नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. या अहवालानंतर संबंधित पक्षांना सुनावणीद्वारे आपली बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.