बिहारमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणाचं काम ९८ टक्के पूर्ण झालं असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. आतापर्यंत गोळा झालेल्या माहितीनुसार सुमारे २० लाख मतदारांचं आधीच निधन झालं आहे, तर सुमारे २८ लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत. सुमारे ७ लाख मतदारांची नावं एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवली गेली आहेत. प्रारूप मतदारयादी येत्या १ ऑगस्टला जाहीर होणार असून त्यात राज्यातल्या सर्व पात्र मतदारांची नावं यावीत या करता कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत असं आयोगाने सांगितलं.
Site Admin | July 23, 2025 7:06 PM | Bihar Election
बिहारमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणाचं काम ९८ टक्के पूर्ण
