बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार संपल्यापासून मतदान होण्यापर्यंतच्या शांतता कालावधीत निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी निवडणूक आयोगानं नियमावली जाहीर केली आहे. या ४८ तासांच्या कालावधीत निवडणुकीवर प्रभाव टाकणारा कोणताही मजकूर प्रसारित करू नये अशा सूचना आयोगानं वृत्तवाहिन्या, नभोवाणी आणि केबल नेटवर्कना केल्या आहेत. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा आणि इतर राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ६ आणि ११ नोव्हेंबर या दोन टप्प्यात बिहारमधे मतदान होणार आहे.
Site Admin | October 26, 2025 8:03 PM | Bihar Assembly Elections | ECI | ECISVEEP | Exit Polls
ECI: निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी नियमावली जाहीर