परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून फ्रांस च्या दौऱ्यावर असून ते नुकतेच पॅरिसला पोचले आहेत. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. भारत आणि फ्रान्सच्या वस्त्रपरंपरेसंबंधातल्या एका प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. या दौऱ्यात ते फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्यो नोएल बॅरो यांची भेट घेऊन भारत फ्रान्स व्यूहात्मक भागीदारी आणि इतर जागतिक महत्वाच्या बाबींवर चर्चा करतील. फ्रेंच राजदूतांच्या एका परिषदेलाही ते संबोधित करतील. फ्रान्सनंतर ते लक्झेम्बर्ग ला भेट देणार आहेत. तिथे ते लक्झेम्बर्गचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करतील आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील
Site Admin | January 5, 2026 6:18 PM | EAM Dr S Jaishankar
परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आजपासून फ्रांस दौऱ्यावर