परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर काल संध्याकाळी रशियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर मॉस्कोला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान, परराष्ट्र व्यवहारमंत्री रशियाचे समपदस्थ सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्यांचा आढावा घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी उभे देशांच्या दृष्टिकोनाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. दीर्घकालीन आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भारत-रशिया विशेष धोरणात्मक भागीदारीला आणखी बळकटी देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. डॉ. एस. जयशंकर आज भारत-रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील आंतर-सरकारी आयोगाच्या 26 व्या सत्राचं सह-अध्यक्षपद भूषवतील. त्यानंतर ते मॉस्को इथं भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीलाही संबोधित करतील.
Site Admin | August 20, 2025 9:50 AM | EAM Dr S Jaishankar
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर मॉस्कोमध्ये दाखल
