डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ई-श्रम पोर्टलवर 30 कोटी 68 लाखांहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी

ई-श्रम पोर्टलवर 30 कोटी 68 लाखांहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी झाली असून, त्यात 53 टक्क्यांहून अधिक महिला आहेत, अशी माहिती लोकसभेत काल कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. असंघटित कामगारांचा व्यापक राष्ट्रीय माहितीसाठा तयार करण्यासाठी हे पोर्टल 2021 मध्ये सुरू करण्यात आले होते.

 

आतापर्यंत विविध केंद्रीय मंत्रालयं आणि विभागांच्या 13 योजना ई-श्रम पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान-स्वनिधी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा