मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई-बग्गी सेवेला प्रारंभ

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई- बग्गी सेवेला आज प्रारंभ  झाला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दूरस्थ पद्धतीने याचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल, आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले. ही ई-बग्गी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशदारापासून कान्हेरी गुंफांपर्यंत धावेल. त्यामुळे प्रवास जलद आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.  वनमंत्री गणेश नाईक, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.