January 5, 2026 7:05 PM

printer

भारताचा चिनी व्यावसायिकांसाठी ई-बी-फोर ई-प्रोडक्शन इनव्हेस्टमेंट बिझनेस व्हिजा सुरू

व्यावसायिक कामासाठी भारतात येणाऱ्या चिनी व्यावसायिकांसाठी भारतानं ई-बी-फोर हा ई-प्रोडक्शन इनव्हेस्टमेंट बिझनेस व्हिजा सुरू केला आहे. १ जानेवारीपासून हा व्हिजा सुरू झाला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, असं चीनमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. साधारण ४५ ते ५० दिवसांत हा व्हिजा मिळेल आणि त्यावर सहा महिन्यांपर्यंत भारतात राहता येईल. कामासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन भारतानं हा नवा व्हिजा सुरू केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.