उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाचं उत्थापन होऊन या दिवशी सीमोल्लंघन साजरं केलं जातं. तर उत्तरेकडच्या राज्यांमधे रावण दहनाने रामलीलेचा समारोप होतो.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त उद्या अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी समारंभही उद्या नागपूरच्या मुख्यालयात होणार आहे. ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिनही उद्या नागपूरमध्ये साजरा होत आहे. या निमित्तानं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी नागपूरमध्ये येत आहेत.