September 30, 2025 12:32 PM | DurgaPuja

printer

‘दुर्गा पूजा’ उत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्गा पूजा उत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाची संस्कृती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. महिलांचा सन्मान राखण्यासाठी आणि समाजात त्यांचं योग्य स्थान जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. तर हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि शांती घेऊन येवो अशी प्रार्थना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.