डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातल्या मध्यमवर्गीयांच्या राहणीमानात सुधारणा झाल्यामुळे कृत्रिम वस्त्राची मागणी वाढत आहे- वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह

कृत्रिम वस्त्र हे आपल्या दैंनदिन जीवनाचा भाग बनले आहे. देशातल्या मध्यमवर्गीयांच्या राहणीमानात सुधारणा झाल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे, असं केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं. ते मुंबईत आयोजित केलेल्या १० व्या नॉन वोवन टेक आशिया आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात बोलत होते. कृत्रिम वस्त्र उत्पादनांद्वारे कृषी, आरोग्य, स्वच्छता आणि गाळण प्रक्रिया या क्षेत्रात नाविन्य आणण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी वाढीव रोजगार निर्मितीमध्ये कृत्रिम वस्त्र क्षेत्राची भूमिका स्पष्ट केली.