फेंजल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता

फेंजल वादळाचा प्रभाव आणि परिणाम राज्यातही दिसून येत आहे. परभणी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, परभणी आणि आसपासच्या काही भागात काल जोरदार पाऊस पडला. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभरा, कापूस आणि तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात काहीशी वाढ झाली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. युरोपातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे परदेशी पाहुणे मालवण, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले आहेत. पुढचे साधारण दोन तीन महिने या पक्षांचा मुक्काम सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर असेल.