दहावा वार्षिक वर्ल्ड फ्री झोन्स ऑर्गनायझेशन काँग्रेसला आजपासून दुबईत मदिना जुमैरै इथं सुरुवात होत आहे. आज सुरु झालेली ही परिषद 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. मुक्त व्यापार क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक संकल्पना आणि या क्षेत्रातल्या आव्हानांसंबधी विचारविमर्श करण्यासाठीचा हा मंच आहे. या परिषदेत मुक्त व्यापाराशी संबधित चर्चासत्रे, उपक्रम, तसेच कार्यशाळा होतील. 35 तज्ञ मार्गदर्शन करतील.
Site Admin | September 23, 2024 8:34 PM
वर्ल्ड फ्री झोन्स ऑर्गनायझेशन काँग्रेसला आजपासून दुबईत मदिना जुमैरै इथं सुरुवात