डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘दुबई’ शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये सर्वोच्च स्थानावर, जागतिक पातळीवर पाचव्या स्थानी

ग्लोबल सिटी इंडेक्स २०२४ या अहवालाच्या आकडेवारीनुसार दुबई हे शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमधून प्रथम क्रमांकावर असलेलं शहर म्हणून उदयाला आलं असून सलग दोन वर्षं ते सर्वोच्च स्थानावर आहे. सिंगापूर, लॉस एंजेलिस, सिडनी, सॅन फ्रान्सिस्को, ॲमस्टरडॅम अशा शहरांना मागे टाकून दुबईने जागतिक पातळीवर पाचवं स्थान पटकावलं आहे. जागतिक व्यापार केंद्र म्हणून दुबईचं स्थान आणि मजबूत अर्थव्यवस्था हे यामागचं कारण असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.