दुबई एअर शोमध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. तेजस प्रकारातलं हे विमान होतं. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील, असं हवाई दलानं कळवलं आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमेरमध्ये तेजस विमान कोसळलं होतं. गेल्या २३ वर्षांपासून ही विमान भारतीय वायू दलाच्या सेवेत आहेत.