यावर्षीचा दुबई एअर शो आजपासून सुरू होत आहे. भारतीय वायु दल आपल्या सुर्यकिरण एरोबॅटीक पथक आणि तेजस या हलक्या लढाऊ विमानांसह यामध्ये सहभागी होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार असून ते संयुक्त अरब अमीरातीच्या संरक्षण मंत्र्यांसोबत यावेळी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
भारतासह ५० देशांमधल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या संरक्षण सामग्री उत्पादन आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्य वाढवण्याबाबतच्या गोलमेज परिषदेत सेठ अध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत.