डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 25, 2024 6:44 PM | Amit Shah

printer

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांचं लोकार्पण

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीमध्ये पुसा इथं नव्यानं स्थापन झालेल्या दहा हजारापेक्षा जास्त बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रं, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरणही केलं. पंचायतींमध्ये कर्जाची सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आर्थिक साधनं तयार करण्यात आली आहेत. देशाच्या ग्रामीण भागातल्या जनतेला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत सहभागी होण्यासाठी ती उपयोगी ठरतील.