डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 16, 2025 1:25 PM | Drugfree | NCB

printer

देशाला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी तपास यंत्रणेचं चांगलं काम – गृहमंत्री अमित शाह

देशाला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी तपास संस्था चांगलं काम करत असून अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे दिला आहे. 

 

इम्फाळमधे नुकतेच ८८ कोटी रुपयांच्या मेथमफेटामाइन टॅब्लेट एनसीबीने जप्त केल्या. तसंच आंतरराष्ट्रीय  अमली पदार्थ रॅकेटशी संबंधित असणाऱ्या चौघांना अटक केली. गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईचं कौतुक केलं आणि अमली पदार्थविरोधात कारवाई सुरूच राहील असं सांगितलं. देशाला अमली पदार्थमुक्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा शहा यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.