डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुढच्या ४ वर्षांत दुष्काळमुक्त देशासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री सी आर पाटील

पुढच्या चार वर्षांत देशातलं कोणतंही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये, आणि देश दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी आज सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात अस्तगाव इथं गोदावरी उजवा तट कालव्यावरचं बांधकाम आणि अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.  शासन तर आपलं काम करणारंच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं पाण्याचा काटकसरीनं वापर केला पाहिजे, गावातलं पाणी गावातच अडवून साठवावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा