दुर्गम आणि आदिवासी भागात २००० वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

केंद्र सरकारनं देशाच्या विविध भागात दोन हजार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. देशाच्या दुर्गम आणि आदिवासी भागात ही प्रशिक्षण केंद्र सुरू  करण्यात  येतील, यामुळे तरुणांना आणखी एक कौशल्य आत्मसात करता येईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं गडकरी म्हणाले.  देशात सध्या सुमारे २२ लाख  वाहन  चालकांची आवश्यकता आहे; आणि या प्रशिक्षण केंद्रांमधून कुशल वाहन चालक तयार होतील असं गडकरी  यावेळी  म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.