ओडिशात बालापूर जिल्ह्यातल्या चंडीपूर एकात्मिक चाचणी तळावरून आज भारतानं व्हीएल एसआरसॅम या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय नौदलानं ही चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र परिमाणांच्या सर्व कसोट्यांवर उतरलं. ही जहाजस्थित क्षेपणास्त्र प्रणाली असून त्यामुळे विविध प्रकारच्या हवाई धोक्यांचा सामना करता येतो
Site Admin | September 12, 2024 7:59 PM | VL-SRSAM
व्हीएल एसआरसॅम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
