January 1, 2026 12:02 PM | DRDO | Odisha

printer

डीआरडीओच्या दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने काल ओडिशाच्या किनारपट्टीवरून दोन प्रलय या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. क्षेपणास्त्रांच्या वापराच्या मूल्यांकन चाचणीचा भाग म्हणून याचे प्रक्षेपण करण्यात आले. चांदीपूर इथून प्रक्षेपित केलेली ही क्षेपणास्त्रे नियोजित मार्गाने गेली आहेत. प्रलय हे स्वदेशी बनावटीचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे दीडशे ते पाचशे किमी पल्ल्याचे बॅलास्टिक क्षेपणास्त्र आहे.