राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं. नौदलतळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी आएनएस वाघशील पाणबुडीतून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांच्यासोबत होते. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतरच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला असून अठरा किलोमीटर परिसरात मासेमारी बंद करण्यात आली आहे.
Site Admin | December 28, 2025 4:52 PM | Draupadi Murmu | kadamb | karvar
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट