भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची, तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या विकासात लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था अस्थिर झाली तरी त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये, इतकी अर्थव्यवस्था मजबूत असावी, असं राष्ट्रपती म्हणाल्या.