सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठीचे स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम हे आर्थिक विकास आणि सामाजिक समावेशनाचं एक शक्तिशाली साधन ठरले आहेत, असं राष्ट्रपती या पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना म्हणाल्या.
सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांनी औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा विकास, सामाजिक उन्नती आणि संतुलित प्रादेशिक विकासाचा पाया घातल्याचंही मुर्मू यावेळी म्हणाल्या.