राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर असून आज त्या कटक इथं रवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत तसंच रवेनशॉ कन्याशाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करणार आहेत.
15 व्या शतकातले महान ओडिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार असून, कलिंगरत्न पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. हा दौरा आटोपून राष्ट्रपती संध्याकाळी दिल्लीत पोहोचतील.