राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात त्या भुवनेश्वर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.
तसंच उद्या (मंगळवारी) रेवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती मुर्मू उपस्थित राहतील, यावेळी त्यांच्या हस्ते रेवेनशॉ गर्ल्स हायस्कूलच्या तीन इमारतींच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात येणार आहे.
याशिवाय कटक इथं आदिकबी सरला दास यांच्या जयंती समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार असून 2024 चा कलिंग रत्न पुरस्कार प्रदान सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे.