डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल- राष्ट्रपती

तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज उत्तर प्रदेशात बरेली इथे पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशभरातल्या पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल, असंही त्या यावेळी म्हणाल्या. 

 

प्राण्यांची सेवा करणं ही नैतिक जबाबदारी असून पशुवैद्यांना त्यांच्या कामाप्रति वचनबद्ध राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच, त्यांनी ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा सुलभरित्या मिळण्याचं महत्त्वही अधोरेखित केलं. प्राण्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार देण्यासाठी गावोगावी पशु आरोग्य मेळावे नियमितपणे आयोजित करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.