जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं भारत वेगानं प्रगती करत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेची चालक म्हणून पुढं येत आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
त्या आज राष्ट्रपती भवनात ‘सोर’, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेसाठी कौशल्य कार्यक्रमांतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ तंत्रज्ञान नसून भारतात सकारात्मक बदल आणण्याची संधी आहे, असं त्या म्हणाल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यमंत्री जयंत चौधरी यावेळी उपस्थित होते.