राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्यामध्ये, राज्यातल्या विविध औपचारिक आणि विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.
आज त्या इम्फाळमध्ये दाखल होणार आहेत. राज्याच्या क्रीडा वारसाचे प्रतीक असलेल्या मापल कांगजेइबुंगला भेट देऊ पोलोचा सामना पाहातील. राष्ट्रपती उद्या नुपी लाल स्मारक संकुलाला भेट देतील, तसंच जाहीर सभेला संबोधित करतील.