आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन असून त्यानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुरमू उपस्थतीत राहून मार्गदर्शन करणार आहेत.
1948 साली आजच्या दिवशी मानवाधिकाराची सार्वभौम घोषणा करण्यात आली होती. सर्वांसाठी आवश्यक जनसेवांची उपलब्धता निश्चित करणे ही यावर्षीच्या मानवाधिकार दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव पि के मिश्रा यांच या कार्यक्रमात मुख्य भाषण होणार असून यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगाचे प्रतिनिधि, तसच देशातील सर्व राज्य सरकारचे प्रतिनिधि आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या सर्व कारागृहांमध्ये आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील सर्व कारागृहांत ‘कैद्यांचे मानवी हक्क आणि संरक्षण’ या विषयी माहितीपुस्तिकेचं वाटप आणि मार्गदर्शन करून कायदेविषयक जागृती करण्यात येणार आहे.