सामायिक सांस्कृतिक वारसा आणि लोकशाही मूल्ये ही भारत-मंगोलिया संबंधांचा पाया आहेत, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे, त्या काल राष्ट्रपती भवनात मंगोलियाच्या राष्ट्रपती खुरेलसुख उखना आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केल्यानंतर बोलत होत्या.
भारत आणि मंगोलिया हे धोरणात्मक आणि सांस्कृतिक शेजारी असून गेल्या 25 वर्षांत भारतानं मंगोलियामध्ये विविध सांस्कृतिक प्रकल्प हाती घेतले आहेत, ज्यामध्ये बौद्ध मठांचा जीर्णोद्धार आणि प्राचीन हस्तलिखितांचं पुनर्मुद्रण यांचा समावेश आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमासंबंधीचा सामंजस्य करार दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यासाठी एक मजबूत पाया प्रदान करेल असा विश्वासही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला.