December 4, 2025 7:50 PM | Drama Competition

printer

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे विविध विभागांमधले निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत मुंबई केंद्रातून ‘ती, ती आणि ती’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. नाशिक केंद्रातून ‘काळाच्या पंजातून’ या नाटकाला, सांगली केंद्रातून ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाला तर लातूर विभागातून ‘दास्तान’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. सिंधुदुर्ग केंद्रातून ‘सूनबाई तोऱ्यात’ या नाटकाला, सातारा केंद्रातून ‘पोकळ घिस्सा’ या नाटकाला तर नांदेड केंद्रातून ‘संपूर्ण’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. चंद्रपूर केंद्रातून ‘तांडा’ या नाटकाला, अमरावती केंद्रातून ‘वारकरी’ या नाटकाला तर पिंपरी चिंचवड केंद्रातून ‘सखा’ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.