December 8, 2025 3:56 PM | Nanded

printer

ड्रॅगन बोट स्पर्धेत वैष्णवी घरजाळे हिला सुवर्णपदक

नांदेड इथं नुकत्याच झालेल्या बाराव्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत लातूरमधल्या एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी घरजाळे हिने सुवर्णपदक पटकावलं.

 

या आधी तिने २०२२ साली थायलंडमध्ये  झालेल्या चौदाव्या एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक  मिळवलं होतं. या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.