August 30, 2024 8:17 PM

printer

डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांनी कॅबिनेट सचिव म्हणून पदभार स्विकारला

भारतीय प्रशासकीय सेवेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांनी आज कॅबिनेट सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या आधीचे कॅबिनेट सचिव राजीव गउबा सेवानिवृत्त झाले. डॉ. सोमनाथन १९८७च्या तुकडीचे तमिळनाडू केडरचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयात संयुक्त सचिव आणि अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे.