October 16, 2025 2:35 PM | S Jayshankar

printer

राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर द्यायला हवा- परराष्ट्र मंत्री

 दहशतवाद, आर्थिक अस्थिरता आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर द्यायला हवा, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

 

संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सैन्यदल प्रमुखांच्या परिषदेला नवी दिल्लीत संबोधित करत होते.  संरक्षणात्मक उपकरणे, सायबर क्षमता आणि सर्वोच्च दर्जाच्या मोहिमेच्या तयारीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितलं.