अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातली पिकं, आधुनिक तंत्रज्ञान पाहता यावं हा याचा हेतू आहे. यंदा अकराशे हेक्टरवर पिक प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. या शिवार फेरीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली. या शिवार फेरीत शेतकऱ्यांना २० एकर जमीनीवर २०७ पिक प्रात्यक्षिकं पाहता येणार आहेत. कापणी पश्चात तंत्रज्ञान, मिर्ची संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कडधान्ये, तेलबिया पिकं,कापूस, भरडधान्य आदी पिकांची माहिती घेता येईल, असं गडाख यांनी सांगितलं.
Site Admin | September 19, 2024 4:53 PM | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचं आयोजन
