इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर के. कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर आज बंगळुरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी रामन संशोधन संस्थेत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, इस्रोचे प्रमुख डॉक्टर व्ही. नारायणन यावेळी उपस्थित होते. प्रधान यांनी यावेळी कस्तुरीरंगन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आखणीत त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं, असं प्रधान यांनी सांगितलं. के. कस्तुरीरंगन यांचं २५ एप्रिल रोजी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
Site Admin | April 27, 2025 8:27 PM | dr k kasturirangan
इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के. कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
