येत्या काळात विज्ञान आणि नवीन उपक्रम फक्त पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे नसून देशाच्या आर्थिक वाढीसाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील असं, मत पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत विविध संस्थांनी विकसित केलेली १४ प्रमुख उत्पादनं आणि उपक्रमांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी आता मेघदूतवर झाली आहे. त्यावर येणाऱ्या दैनंदिन हवामानविषयक माहितीमुळे सुरक्षित मच्छिमारी क्षेत्र तयार होत असल्याचं ते म्हणाले.