कांगोमधल्या संघर्षादरम्यान शेजारच्या बुरुंडी या देशात आश्रय घेणाऱ्या ५३ शरणार्थींचा मृत्यू झाल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांशी संबंधित संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यापैकी २५ जणांचा मृत्यू कॉलराच्या प्रादुर्भावामुळे, तर सहा जणांचा मृत्यू रक्तक्षय आणि कुपोषणाशी संबंधित इतर आजारांमुळे झाल्याचं यात म्हटलं आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला सीमा भागातला संघर्ष तीव्र झाल्यावर आणि बंडखोरांनी उविरा शहर ताब्यात घेतल्यावर कांगोमधल्या १ लाखापेक्षा जास्त नागरिकांनी बुरुंडीमध्ये आश्रय घेतला आहे.