May 10, 2025 1:49 PM | DonaldTrump

printer

रशिया आणि युक्रेन यांनी ३० दिवस युद्धविराम घोषित करावा- डोनाल्ड ट्रम्प

रशिया आणि युक्रेन यांनी ३० दिवस युद्धविराम घोषित करावा असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. याचं उल्लंघन केलं तर नव्या निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. दोन्ही देशांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचं स्वागत केलं आहे. रशिया चर्चेसाठी तयार आहे, असं पेस्कोव्ह म्हणाले.