मलेशिया इथं होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रवाना झाले आहेत. हा त्यांचा राजकीय दौरा असून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यासह ते अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प व्यापार युद्ध संपवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करतील. नोव्हेंबरच्या एक तारखेपासून लागू होणारा अतिरिक्त शंभर टक्के कर टाळण्यासाठी चीन करार करण्यासाठी सहमत होईल, असा विश्वास ट्रम्प यांनी वॉशिंग्टन इथं बोलताना व्यक्त केला. मलेशियातल्या या दौऱ्यात ट्रम्प एका नव्या व्यापार करारासह थायलंड-कंबोडियामधल्या शांतता करारावर सुद्धा स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते जपानच्या नवनियुक्त आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री साने ताकाची यांची देखील भेट घेणार आहेत.
Site Admin | October 25, 2025 3:09 PM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियान परिषदेसाठी आशिया दौऱ्यावर