January 17, 2026 6:13 PM | Dolphin | India

printer

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा सरकारचा उपक्रम

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा उपक्रम  सरकारने हाती घेतला आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दोन टप्प्यात हे सर्वेक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या मुख्य प्रवाहात म्हणजे बिजनौर ते गंगासागर आणि सिंधु नदीच्या खोऱ्यात हे सर्वेक्षण होईल तर दुसऱ्या टप्प्यात ब्रम्हपुत्रा,  गंगेच्या उपनद्या तसंच सुंदरबन आणि ओदिशात हे सर्वेक्षण होईल.  पर्यावरण, जंगले आणि हवामान बदल मंत्रालयाने ही माहिती दिली. डॉल्फिन्सच्या प्रजातींची संख्येचा या संर्वेक्षणातून अंदाज येईल आणि प्रोजेक्ट डॉल्फिन अंर्तगत संवर्धन उपक्रमाला त्याची मदत होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.