November 16, 2025 4:51 PM

printer

‘डोकलाम’ आणि ‘चो-ला’ ही ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्याचा सिक्कीम सरकारचा निर्णय

सीमावर्ती भागातल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, सिक्कीम सरकारने ‘डोकलाम’ आणि ‘चो-ला’ ही धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. सिक्कीमच्या पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सी.एस. राव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी प्रवेशासाठी प्रतिबंधित असलेले हे प्रदेश सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करून, साहसी आणि वारसा पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचं सिक्कीम सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.