October 11, 2025 1:40 PM

printer

दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विक्रमी संख्येनं जादा गाड्या उपलब्ध होणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देत नव्याने सुरु झालेल्या यात्री सुविधा केंद्राची पाहणी केली. या केंद्रामुळे रेल्वे स्थानक परिसरातली गर्दी कमी होऊन प्रवासही सुकर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले. इथं पुरवलेल्या सुविधा आणखी ७६ रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवायला मदत होईल असं ते म्हणाले. आगामी, दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विक्रमी संख्येनं विशेष रेल्वेगाड्या धावतील अशी माहिती  वैष्णव यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.