डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 15, 2024 7:41 PM | BMC | Diwali 2024

printer

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या वर्षीच्या दिवाळीनिमित्त २९ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. यासोबतच, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका प्राथमिक शाळेतले तसंच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतले शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण सेवक, अधिव्याख्याते यांनाही बोनस दिला जाणार आहे.  सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त १२ हजार रुपये तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना ५ हजार रुपये भाऊबीज भेट दिली जाणार आहे.