प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त देशवासियांना उद्देशून शुभेच्छा पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आहे.
याशिवाय, यावर्षीची दिवाळी खास आहे कारण, पहिल्यांदाच, देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागांमध्ये दिपोत्सव होत आहे. हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट झाला आहे.”
“आपण नजीकच्या भविष्यात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. ‘विकसित’ आणि ‘आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात, नागरिक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी म्हणजे राष्ट्राप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडणे,” असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.