October 21, 2025 1:49 PM | Diwali 2025

printer

जागतिक नेत्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भारतीय उत्साहात दिवाळी साजरी करत असून विविध जागतिक नेत्यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा विजय असल्याचं अमेरिकेच्या व्हाइट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, अमेरिकी गुप्तचर खातं एफबीआय चे प्रमुख काश पटेल, कॅनडा आणि यूनायटेड किंगडमचे प्रधानमंत्री, युक्रेनचे परराष्ट्रमंत्री तसंच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापुरच्या नेत्यांनी तसंच ब्राझील आणि विविध युरोपीय देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुबईतल्या बुर्ज खलिफा या सर्वात उंच इमारतीवर काल दिवाळीनिमित्त लेसर शो ची रोषणाई केली होती. त्यात दिवाळीच्या शुभेच्छा झळकल्या होत्या. इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रधानमंत्री मोदी आणि भारतीय जनतेला शुभेच्छा देताना दोन्ही देशातील सौहार्दाचा उल्लेख केला आहे.