दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. राज्यात आज नरकचतुर्दशीनिमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंगस्नान करुन, फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करुन सर्वांनी सणाचा आनंद लुटला. सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत आहेत. घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळी पहाटेनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फेही मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमधे मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणेतीन या वेळात होणार आहेत.
राज्याच्या काही भागात दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे. त्यादृष्टीने आपद्ग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही दिवाळीनिमित्त राबवले जात आहेत.