दिवाळीचा सण जगभरातल्या भारतीय दूतावासांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारे, तसंच एकता आणि सौहार्दाचा वैश्विक संदेश देणारे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले. जपानमध्ये शिमाने विद्यापीठात विद्यार्थी, प्राध्यापक आणि भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. म्यानमामध्ये म्यानमा भारत मैत्री संघटना आणि तिथल्या भारतीय समुदायानं जल्लोषात दिवाळीचा सण साजरा केला. हंगेरीत बुडापेस्ट इथल्या भारतीय दूतावासात हिंदी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सोहळ्याचं आयोजन केलं होतं. फिजीची राजधानी सुवा इथल्या पोलीस मुख्यालयानं दिवाळीचा सण साजरा करताना न्यायासाठी वचनबद्ध राहण्याचं आवाहन केलं. दुबईत भारताच्या वाणिज्य दूतावासातही दिवाळीचा उत्सव साजरा झाला.
Site Admin | October 18, 2025 7:52 PM | Diwali 2025
दिवाळीचा सण जगभरातल्या भारतीय दूतावासांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा
